अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा

अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा

 

चीन देशांतल्या एका शहरामध्यें एक गरीब शिंपी राहात होता. कपडे शिवून जे काय पैसे त्यावर तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असे. त्याला एक मुलगा होतो. त्याचं नांव अल्लउद्दीन. तो लहानपणापासून उनाड होता. शाळेंत पाठविला तर शाळेंत जात नसे. काही काम सांगितलं तर ते करीत नसे. तो दहा वर्षांचा झाल्यावर बापानं आपल्या दुकानांत शिंपीकाम शिकण्यासाठी नेलं; परंतु त्याचं कामाकडे जराहि लक्ष लागेना. त्याला कितीहि समजावून सांगितलं तरी तो समजून घेत नसे. त्याला कितीहि मार दिला तरी तो ऐकत नसे. त्याच्या आईनं आणि बापानं त्याला नानातऱ्हेनं समाजवालं. प्रेमानं त्याची समजून घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या वर्तनांत काडीचीही सुधारणा झाली नाही. मुलाच्या दुर्वर्तनामुळें त्याला अन्नपाणीहि गोड लागेना. तो आजारी पडला आणि शेवटी देवाघरी गेला.

       परंतु अल्लाउद्दिनाला मुळींच दु: झालं नाही. तो आपला पूवीसारखाच वागत राहिला. तेव्हां त्याच्या आईनं दुकान आणि आतली सर्व चीजवस्तु राहिला. तेव्हां त्याच्या आईनं दुकान आणि आतली सर्व चीजस्तु विकून टाकली. ती स्वत: कष्ट करून स्वत:साठी आणि मुलासाठी मठिभाकरी मिळवूं लागली. परंतु आपल्या आईला त्रास पडतो ह्याचीं उल्लाउद्दिनाला मुळींच खंत वाटली नाहीं. उलट तो जास्तच शेफारून गेला. वयाच्या पंधाराव्या वर्षापर्यंत त्याचं असंच चाललं होतं.

       एके दिवशीं अल्लाउद्दीन आपल्या मोहल्ल्यांत उनाड सवंगड्या बरोबर खेळण्यात दंग झाला होता. इतक्यांत मोरोक्कोंती मूर जातीचा एक दरवेशी त्या ठिकाणी आला. त्या मुलांकडे पाहतां पाहतां त्याचं लक्ष अल्लाउद्दिना कडे गेल. त्याबरोबर तो त्याच्याकडे अगदीं एकाग्रतेनं पाहूं लागला. हा दरवेशी एक मघाबी जादूगार होता. जादूच्या जोरावर तो कांहीहि करू शकत असे. अल्लाउद्दिनाकडे अत्यंत बारीक नजरेनं पाहिल्यावर तो स्वत:शींच म्हणाला, ‘ज्याच्या शोधासाठी मी माझा देश सोडून आलों तो हाच मुलगा !’

       ताबडतोब त्यानें एका पोराला हाताशीं धरून बाजूला नेलें आणि उल्लाउद्दिनाकडे बोट दाखवून तो कोण, कुठं राहतो वगैरे माहीती काढून घेतली. नंतर तो जादूगार अल्लाउद्दिनाजवळ आला आणि त्याला म्हणाला, ‘मुला तूं शिंप्याचा मुलगा ना ?’

       होय, पण माझे बाबा केव्हांच वारले.’ अल्लाउद्दिन म्हणाला. तें ऐकतांच त्या चादूग्रारनं अल्लाउद्दीनाला कडकडून मिठी मारली त्याला प्रेमानं कवटाळीत तो रडूं लागला. त्यामुळं अल्लाउद्दीन अगदीं बुचकळ्यांत पडला. त्यानं कांहीसं गोंधळून विचारलं, ‘महाराज, तुम्हांला एकाएकीं रडायला काय झालं? आणि माझ्या बाबांना ओळखतां काय?’

       मी ओळखणा नाहीं तर कोण ओळखणार?’ जादूगार भावनाशील आवाजांत म्हणाला, ‘तुला बाप तो माझा अगदीं रख्खा भाऊ ! फार वर्षापूवीं त्याच्याशीं भाडून मी दुसऱ्या देशांत जाऊन राहिलें. पण तो मेला असें सांगून तूं माझ्या ह्दयाला मोठाच धक्का दिलास. मी तुझ्या बापाशी भांडून गेलों तेव्हां तो एकटा होता. त्याचं लग्रहि झालेलं नव्हतं!’

       आणि पुन्हां एकदां त्यानं अल्लाउद्दिनाला मिठी मारली. त्याला छातीशीं धरून तो म्हणाला, ‘आतां तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे?’ असं म्हणून त्यानं आपली पिशवी उघडली आणि तिच्यांतून दहा सोन्याच्या मोहरा काढून त्या अल्लाउद्दिनाला देऊन तो म्हणाला, ‘बेटा, तुझं घर कुठं आहे? आणि तुझी आई कुठ आहे?’

       अल्लाउद्दिनानं चटकन त्याला आपल्या घराची वाट दाखविली. पण तो जादूगार म्हणाला, ‘हे पैसे घे आणि तुझ्या आईला दे. तिला सांग तिचा दीर परदेशांतून आला आहे. उद्यां मी तिला भेटायला येईन!’

       हें ऐकतांच उल्लाउद्दिन झपाटयानं आपल्या आईला भेटायला घरीं आला. त्याला या वेळीं घरीं आलेला पाहून त्याच्या आईला फारच आचर्य वाटलं. कारण तो जेवणाच्या वेळेशिवाय कधींच घरीं येत नसे. तो आईजवळ गेला आणि सोन्याच्या दहा मोहरा आईजवळ देऊन मोठ्या आनंदाने म्हणाला, ‘आई, तुझ्यासाठीं मी मोठी आनंदाची बातमी आणली आहे! माझा काका इतकीं वर्षं परदेशांत होता, तो आला आहे. त्यानंच मला ह्या मोहरा दिल्या आणि तुला त्यानं नमस्कार सांगितला आहे.’

       त्याच्या आईनं विचारंल, ‘अरे, हा कोण कुठचा काका? तुला काका होता कधीं?’

       आई, तूं असं कसं म्हणतेस? त्यानं मला मिठी मारली, हृदयाशीं कवटाहलं!’ अल्लाउद्दिन जास्तच गोंधळून म्हणाला.

      

Comments