अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा
अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा चीन देशांतल्या एका शहरामध्यें एक गरीब शिंपी राहात होता . कपडे शिवून जे काय पैसे त्यावर तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असे . त्याला एक मुलगा होतो . त्याचं नांव अल्लउद्दीन . तो लहानपणापासून उनाड होता . शाळेंत पाठविला तर शाळेंत जात नसे . काही काम सांगितलं तर ते करीत नसे . तो दहा वर्षांचा झाल्यावर बापानं आपल्या दुकानांत शिंपीकाम शिकण्यासाठी नेलं ; परंतु त्याचं कामाकडे जराहि लक्ष लागेना . त्याला कितीहि समजावून सांगितलं तरी तो समजून घेत नसे . त्याला कितीहि मार दिला तरी तो ऐकत नसे . त्याच्या आईनं आणि बापानं त्याला नानातऱ्हेनं समाजवालं . प्रेमानं त्याची समजून घालण्याचा प्रयत्न केला . परंतु त्याच्या वर्तनांत काडीचीही सुधारणा झाली नाही . मुलाच्या दुर्वर्तनामुळें त्याला अन्नपाणीहि गोड लागेना . तो आजारी पडला आणि शेवटी देवाघरी गेला . परंतु अल्लाउद्दिनाला मुळींच दु : ख झालं नाही . तो आपला पूवीसारखाच वा...